दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी -नामदेव तौर
परतूर :आमदार विनायकराव मेटे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीधर जवळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर करण्यात आले होते शिबिर सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली होती त्यात शिबिरामध्ये बी पी ,शुगर, रक्त तपासणी, सर्दी ,खोकला, ताप ,अशा सर्वच आजाराची तपासणी त्या शिबिरामध्ये करण्यात आली होती त्या शिबिराचा लाभ सर्वच जास्तीत जास्त महिलांनी व गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्या शिबिरामध्ये .दीपक तारे सर, शिवहरी डोळे सर, संतोष संमेटा सर,दिपक वैद्य सर, प्रदीप चव्हाण सर आधी डॉक्टर उपलब्ध होते त्यावेळेस गावातील सरपंच वसंत राजबिंडे , सचिन खरात तालुकाध्यक्ष शिवसंग्राम,आबासाहेब बागल, तुकाराम राजबिंडे, सिद्धेश्वर राजबिंडे, भानुदास बागल, भारत राजबिंडे, अमोल राजबिंडे, भागवत काटे आधी गावकरी व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.