दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे लोहा तालुक्यातील निळा या गावचे कर्तव्यदक्ष सरपंच गजानन पाटील मोरे यांची सुर्योदय मन्याड फाऊंडेशनच्या लोहा तालुका युवा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
लोहा येथील शासकीय विश्रामगृहात सुर्योदय मन्याड फाऊंडेशनची बैठक मन्याड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी मन्याड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ दादा पवार यांनी लोहा -कंधार तालुक्याचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते तथा निळा या गावचे कर्तव्यदक्ष सरपंच गजानन पाटील मोरे यांची सुर्योदय मन्याड फाऊंडेशनच्या लोहा तालुका युवा अध्यक्ष पदी निवड करून नियुक्ती पत्र दिले.
यावेळी मन्याड फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष बालाजीसिंग परदेशी, लोहा तालुकाध्यक्ष ब्रम्हानंद सिरसाठ रामेश्वर पाटील पवार मुंरबीकर, गजानन जोशी, तुळसीराम लुंगारे, बाळासाहेब जाधव, संग्राम डिकळे, पांडूरंग पाटील लोंढे, आदी उपस्थित होते.