दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि.६ जुलै २०२२ रोजी सकाळी ७:०० वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.
अहवालानुसार,पूर्णा मध्यम प्रकल्पात बुधवार दिनांक ६ रोजी जलाशय पातळी ४४९.०१ मी. आहे.या प्रकल्पाचे नऊ दरवाजे १० से.मी. वर उचलण्यात आले आहेत.अकोला येथील घुंगशी बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे वर उचलण्यात आले आहेत.या प्रकल्पात आजची जलाशय पातळी २५७.४० मी. आहे.
*विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालीलप्रमाणे (मी.मध्ये)*
अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा (३३८.९८),यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (३८९.९९),अरुणावती (३२५.६७),बेंबळा (२६६.१०),अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (३४२.२०),वान (३९७.९८),बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (२८८.७८),पेनटाकळी (५५५.०५),खडकपूर्णा (५१६.५१).
*मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालीलप्रमाणे (मी.मध्ये)*
अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (४३७.९०),चंद्रभागा (४९७.८५),पूर्णा (४४९.०१),सापन (५०४),पंढरी (४२४.७६),गर्गा (३४४.१०),यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (३०३.१४),अडाण (३७६.६२),सायखेडा (२७०.९७),गोकी (३१२.३८),वाघाडी (३१५.१०),बोरगांव (३१५.६०),नवरगांव (२५१.६२),अकोला जिल्ह्यातील निर्गुणा (३८४.५५),मोर्णा (३६१.७०),उमा (३३८.८०),घुंगशी बॅरेज (२५७.४०),वाशिम जिल्ह्यातील सोनल (४४८.६०),एकबुर्जी (१४४),बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (४००.४०),पलढग (३९७.७५), मस (३२१.८५),कोराडी (५४४.९०),मन (३६९.७०),तोरणा (४०१.३०),उतावळी (३६५.३०) आहे.