दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यातील धारणी तालूक्यातील साडे तीन वर्षीय मुलाला अचानक श्वसनाचा त्रास सुरु झाला.त्याकरिता त्याचेवर धारणी येथे उपचार कण्यात आले परंतु त्याने आराम न झाल्याने रुग्णास परतवाडा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता,दम लागत होता व सोबतच खोकला व ताप देखील होता या सर्वांसाठी आईवडील डॉक्टरकडून उपचार घेत होते.परंतु एक महिन्याच्या उपचारानंतर देखील रुग्णास आराम होत नव्हता.डॉक्टर द्वारे रुग्णाचा सी.टी.स्कॅन केले असता त्यामध्ये रुग्णाच्या छातीमध्ये काहीतरी (फॉरेन बॉडी) अडकल्यासारखे आढळून आले.दरम्यान रुग्णाची प्रकृती खालावतच असल्याने रुग्णाच्या नातेवाईकानी अमरावती येथील पलमनोलॉजीस्ट डॉ. सौरभ अंबाडेकर सर यांचे कडे रुग्णास दाखविले.
डॉ.सौरभ अंबाडेकर सर यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाच्या फुफ्फुसामध्ये फॉरेन बॉडी असल्याचे सांगितले.याबाबत रुग्णाच्या आईला विचारले असता त्यांनी ती (फॉरेन बॉडी) फुटाणा असण्याची शंका बोलून दाखवली.यावर डॉ.सौरभ अंबाडेकर सर यांनी ब्रोन्कोस्कोपी करून फॉरेन बॉडी काढणे हाच एकमेव उपचार असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले. रुग्णाच्या फुफ्फुसामध्ये फॉरेन बॉडी हि जवळपास एक महिन्यापासून असल्यामुळे ब्रोन्कोस्कोपी प्रक्रिया करणे हे अत्यंत गुंतागुंतीचे व क्रीटीकल प्रोसीजर असल्याने डॉ.अंबाडेकर सर यांनी रुग्णाला पारिजात हॉस्पिटल अमरावती येथे भरती करून हि प्रोसीजर करण्याबाबत सुचविले.
त्यानुसार रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला राधानगर,अमरावती स्थित पारिजात हॉस्पिटल येथे भरती केले.भरती दरम्यान रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण SPO2 हे कमी असल्यामुळे त्याचेवर PICU (बालरोग अतिदक्षता विभाग मध्ये) उपचार करण्यात आले व लगेच ब्रोन्कोस्कोपी या प्रक्रियेची तयारी करण्यात आली.ब्रोन्कोस्कोपी दरम्यान रुग्णाच्या फुफ्फुसामध्ये एका ठिकाणी फुटाना एक महिन्यापासून अडकून फुगलेला असल्याचे तर दुसरीकडे फुटाण्याचे टरफल अडकलेले असल्याचे दिसून आले.फुफ्फुसामधून ते काढणे हे अत्यंत गुंतागुंतीचे व कठीण काम होते.परंतु पारिजात हॉस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागामध्ये डॉ.सौरभ अंबाडेकर (पलमनोलॉजीस्ट) व डॉ.स्वप्नील शर्मा (कान-नाक-घसा तज्ञ) यांच्या अथक प्रयत्नाने रुग्णाच्या फुफ्फुसामधून फुटाना व त्याचे टरफल यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले.ब्रोन्कोस्कोपी करिता भूलतज्ञ म्हणून डॉ.शिरीष माहुरे यांनी रुग्णाला अनेस्थेशिया देण्याचे महत्वाचे काम पार पाडले.यावेळी पारिजात हॉस्पिटल मधील पेडीयाट्रीक इंटेनसीवीस्ट डॉ.रोहन बोबडे,डॉ.लक्ष्मी भोंड व इतर नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.रुग्णाची यशस्वीरित्या ब्रोन्कोस्कोपी करून फॉरेन बॉडी काढल्यानंतर रुग्णाला PICU (बालरोग अतिदक्षता विभाग) येथे एक दिवस उपचारासाठी ठेवण्यात आले.बालरोग अतिदक्षता विभाग मध्ये डॉ.भूपेश भोंड,पेडीयाट्रीक इंटेनसीवीस्ट डॉ.लक्ष्मी भोंड व डॉ.रोहन बोबडे,डॉ.सुरज राठी,डॉ.सुमित गावंडे यांच्या निगराणीखाली उपचार करण्यात आले.रुग्णाची पुढील काळजी सुद्धा योग्यप्रकारे घेऊन रुग्णास लगेच दोन दिवसात त्याच्या त्रासाचे निवारण करून आईवडिलांन समवेत हॉस्पिटल मधून सुटी करण्यात आली.
यावेळी रुग्णाच्या आई वडिलांनी पारिजात हॉस्पिटल चे संचालक डॉ.भूपेश भोंड सर,डॉ.लक्ष्मि भोंड मँडम,डॉ.रोहन बोबडे सर,डॉ.सौरभ अंबाडेकर सर,डॉ.स्वप्नील शर्मा सर,डॉ.शिरीष माहुरे सर,डॉ.सुरज राठी सर,डॉ.संदीप दानखडे सर,डॉ.मनीषा कस्तुरे मँडम,डॉ.सुमित गावंडे सर व संपूर्ण पारिजात हॉस्पिटल स्टाफ चे आभार मानले.
पारिजात हॉस्पिटलचे संचालक डॉ.भूपेश भोंड यांचेशी यावेळी संपर्क साधला असता त्यांनी पारिजात हॉस्पिटल मध्ये याआधी सुद्धा अश्याप्रकारच्या लहान मुलांच्या दुर्बीणद्वारे तपासणी व उपचार पाचवेळा तर नवजात बाळांमध्ये एकदा,डाॅ.सौरभ अंबाडेकर सरांनी यशस्वीरित्या करण्यात आल्याचे सांगितले व तसेच लहान मुलांच्या व नवजात बाळांच्या कुठल्याही प्रकारच्या व गुतागुंतीच्या शस्त्रक्रिया तसेच अपघात झालेले व जळलेल्या क्रीटीकल रुग्णांवर उपचार पारिजात हॉस्पिटल येथे NICU (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) व PICU (बालरोग अतिदक्षता विभाग) मध्ये नेहमीच यशस्वीरित्या करण्यात येत असल्याचे सांगितले.याशिवाय प्लास्टिक सर्जरी,प्री-म्याचुअर बेबीचे सिझेरिअन,दातांच्या शस्त्रक्रिया,फीजीओ थेरपी,ऑकुपेशनल थेरपी,स्पीच थेरपी या सारख्या अद्ययावत सुविधा पारिजात हॉस्पिटल येथे उपलब्ध असल्याबाबत सांगितले.