दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई–
महागाईचा आता आणखी एक झटका बसला आहे. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर महागला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नवे दर आजपासून लागू झाले असून, आता एका सिलिंडरसाठी 1053 रुपये मोजावे लागणार आहेत.दुसरीकडे मात्र व्यवसायिक सिलिंडरचे दर 8.50 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.