दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई- दिनांक 23 गेल्यावर्षी पट्टीवडगाव तालुका अंबाजोगाई येथील रहिवासी श्री मारुतीराव लव्हारे यांचे अपघाती निधन झाले ते जिल्हा बँकेत अधिकारी होते. दिनांक 23 ऑक्टोबर 2021 हा त्यांचा प्रथम स्मृतिदिन
यानिमित्त त्यांचे चिरंजीव श्री विजयकुमार मारुती राव लव्हारे( मुंडे) हे मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत तर त्यांची कन्या बांद्रा येथे डॉक्टर आहे. आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पट्टीवडगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या शाळेला पुण्यतिथीनिमित्त आदल्या दिवशी संगणकाच्या युगात संगणकावरील काम शाळेतच करता यावे यासाठी स्कॅनर, प्रिंटर, वेब कॅमेरा,संगणक संच हे साहित्य भेट म्हणून दिले. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री तारसे प्रमुख पाहुणे व उदघाटक म्हणून कै. मारुतीराव लव्हारे( मुंडे) यांना शिकवलेले शिक्षक श्री संभाजीराव मोरे (वय 92) हे होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री पंकज भटकर यांनी केले तर प्रास्ताविक सुनील सर यांनी केले व आभार शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक वृक्षमित्र तथा आदर्श शिक्षक श्री राजे साहेब किर्दंत यांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी श्री वंजे श्री शिंदे श्री मकदुम श्री गुटे श्रीमती भुईभार श्रीमती धुमाळ श्रीमती साळुंके यांनी परिश्रम घेतले