दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मोखाडा
मो़खाडा – मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर,सिद्धराम सालीमठ व सीएसआर सीईओ उपेंद्र सोनटक्के यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा करोळ येथे दोन स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी सी एस आर ग्रुपचे सीईओ उपेंद्र सोनटक्के, कार्यकारी अभियंता निवडूंगे, गटविकास अधिकारी आर बी पांढरे, गटशिक्षणाधिकारी वसंत महाले, विस्तार अधिकारी रामचंद्र विशे,अजय पालांडे, अमोल उंडे,प्रितेश पवार, डेप्युटी इंजिनिअर पाध्ये,शाखा अभियंता विजय काळे,केंद्रप्रमुख ना गो विरकर,केंद्रप्रमुख साळुंखे,पालघर बायफ रिझन हेड संदीप काकडे बायफ मोखाडा हेड शिवाजी आदमाने,पांडुरंग कातवारे,अशोक कामडी,शिक्षक सखाराम रेरे,विलास साबळे,दिनेश देसले,शिक्षिका सोनटक्के आदी उपस्थित होते.उपेंद्र सोनटक्के यांच्या प्रयत्नातून एस के फाउंडेशन मुंबई पुरस्कृत इन्स्टिट्यूट टेबल लाईव्ह लिव्ह अँड डेव्हलपमेंट नाशिक यांच्या सहकार्यातून दोन स्वच्छतागृहे तसेच एस्ट्रा ग्रुपने जिल्हा परिषद शाळा करोळ ला एक लाख पंचवीस हजार रुपयांची रंगरंगोटी करून दिलेले असून त्याचा उद्घाटन सोहळा यावेळी जिल्हा परिषद शाळा करोळ येथे उत्साहात संपन्न झाला.तर सोनटक्के परीवाराकडून शाळेसाठी ५५ हजाराची दुरूस्ती करून देण्यात आली.गुणवत्ता राखण्यासाठी कष्ट करण्याची गरज आहे यासाठी शिक्षकांनी अधिक मेहनत घेतली पाहिजे शिक्षकांबरोबर व पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन सिद्धाराम सलिमाठ यांनी केले.यावेळी करोळ गावाला पाणी मिळवून देण्यासाठी वर्षभरात प्रयत्न केले जातील व जिल्हा परिषद शाळेला दोन वर्ग खोल्या देण्यात येतील असेही साली मठ यांच्याकडून सांगण्यात आले.जिल्हा परिषद शाळेतून यूपीएससी व एमपीएससी चे विद्यार्थी घडले पाहिजे अशा पद्धतीने शिक्षण दिले गेले पाहिजे असेही ते म्हणाले तर मी ही जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असून कष्ट केल्यास यशस्वी होणे अवघड नाही असंही यावेळी सीईओ साली मठ म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन शिक्षक नितीन आहेर यांनी केले