दै चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी
आप्पासाहेब चव्हाण
अंबाजोगाई :आज दि . २४ ऑक्टोबर २०२१ श्री. मनोज वाघ ( विशेष शिक्षक ) मुक बधिर निवासी विद्यालय, उमरी, ता.केज , जि. बीड या शाळेवरिल कर्मचाऱ्यांने आपले आयुष्य संपवुन घेतले आणि असा अचानक सोडून गेला . २ वर्षापासून वेतन नसल्याने आर्थिक परस्थिति व मानसिक स्थिती अत्यंत वाईट होती. 1 महिन्या पूर्वीच त्याच्या पत्नीने स्वतःला संपवुन घेतले होते . आज त्यांचे लहान गोंडस मुल आई – वडिलांना पूर्णपणे मुकलेले आहेत. त्यांचा आयुष्याचा आधारच नाहिसा झाला आहे. हे फक्त वेतन नसल्याने . शाळेच्या व्यवस्थापन व शासनाच्या प्रशासनानेच घेतलेले बळी आहेत. आता अम्हा बाकीच्या उरलेल्या कर्मचाऱ्यांचा देखील असाच जीव घ्या तुम्ही. म्हणजे तुमचा सर्वांचा आत्मा शांत होइल का ? असे शाळेतील इतर कर्मचारी तळतळून म्हणत आहेत.असे अजून किती बळी जाणार आहेत.