दैनिक चालू वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयात उच्च माध्यमिक विभागात कार्यरत असलेले विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक, एनसीसी प्रमुख , योगा अभ्यासक, समाजसेवक तथा सामाजिक कार्यकर्ता 10 वर्षांपासून निस्वार्थ व निष्कलंक पणे विद्यार्थ्यांना व भारतातील नवीन पिढीचे शिल्पकार श्री अमरदीप मनोहरराव पाटील यांना राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान व मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय तथा उत्कृष्ट कामगिर बदल दिला जाणारा महात्मा फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१ महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण तथा सार्वजनिक राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते उदगीर येथे रविवार (दि.२४) ऑक्टोबर रोजी रघुकुल मंगल कार्यालयात वितरित करण्यात आले.
जिजाऊ प्रतिष्ठान उदगीर व मराठा सेवा संघ शाखा उदगीर यांच्या वतीने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ प्रतिष्ठान उदगीरचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवश्री प्रा. विवेक सुकणे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीरचे उपजिल्हाधिकारी शिवश्री प्रवीण मेंगशेटटी, तहसीलदार शिवश्री रामेश्वर गोरे, मराठा सेवा संघ लातूर जिल्हा अध्यक्ष शिवश्री रोहन जाधव, मादलापूरचे सरपंच उदय मुंडकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक समीर शेख, जकनाळ गावचे सरपंच रामेश्वर बिरादार, नगरसेवक ताहेर हुसेन, राष्ट्रवादी सेवादल काँग्रेस पार्टीचे राज्य उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, उदगीरचे उद्योगपती शिवश्री बिपीन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री अजित पाटील तोंडचिरकर, मराठा सेवा संघ लातूर जिल्हा सचिव शिवश्री मारोती जाधव, मराठा सेवा संघ लातूर जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री प्रा.गोविंद शेळके, मराठा सेवा संघाचे उदगीर तालुका अध्यक्ष शिवश्री प्रदीप ढगे उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.