दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये खासदार सुद्धा बंडखोरीच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये खासदार आणि संजय राऊत यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे.
सर्व खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे राऊत हे बैठकीनंतर कुणाशीही न बोलता बाहेर पडाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध इतर सर्व खासदार अशी चर्चा झाली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान करण्याची आग्रही भूमिका मांडली.
तर शिवसेनेचा इतर सर्व खासदारांचा NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना मतदान करावे अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली. यावर उद्धव ठाकरे यांनी पुढील दोन दिवसात भूमिका जाहीर करू, असे आश्वासन सर्व खासदारांना दिले. पण, यावेळी मातोश्रीवरच्या बैठकीत संजय राऊत विरुद्ध इतर सर्व खासदार अशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. एवढंच नाहीतर संजय राऊत मातोश्री बाहेर पडल्यावर काही ही न बोलता निघून गेले.