दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी
पालघर:-अनंता टोपले
भारतीय ट्रायबल पार्टी, पालघर जिल्हा कमिटी, जिल्हा अध्यक्ष आदिम अजय जाधव यांच्या उपस्थितीत सर्वानुमते जव्हार येथील हातेरी गावच्या तंटामुक्त समिती सदस्या, शालेय कमिटी सदस्या ,समाजसेवेचा दांडगा अनुभव असलेल्या आदिम, बेबीताई दिघा यांची पालघर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे, प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या आदिम , बेबीताई दिघा यांचे स्वागत करून जिल्हा उपाध्यक्ष पदी
निवड करण्यात आली आहे, न्यहाले येथे जिल्हा सचिव यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या सभेत जाहीर करण्यात आले, प्रसंगी माननीय जिल्हा अध्यक्ष अजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष माननीय संजय घा टाल साहेब, मोखाडा तालुका अध्यक्ष माननीय केशव पवार, जव्हार तालुका अध्यक्ष माननीय कल्पेश धांगटे , जिल्हा संघटक आदिम मोहन बारकु गुहे , जिल्हा सचिव माननीय काशिनाथ भोगाडे , विक्रमगड तालुका संघटक आदिम रवींद्र बाबर, प्रभाकर टोपले, कृष्णा वळवी, महलांचे सबलीकरण करण्यास मोलाचा हातभार लागेल असे मत जिल्हा अध्यक्ष यांनी व्यक्त केले .