पुरवठा विभागाच्या आशिर्वादाने अनधिकृतपणे खुलेआम दुकान सुरू
दैनिक चालू वार्ता
निलंगा प्रतीनीधी
राहुल रोडे
औराद शहाजनी येथील परीसरातील मोठी लोकसंख्या तसेच लोकांना कोणतीही गॅस पुरवठा करणारी अधिकृत एजन्सी आहे की अनधिकृत एजन्सी त्याची माहिती नसल्यामुळे आणी मुख्य एजन्सी ही निलंगा येथे असल्याने ग्राहकांना निलंगा जाऊन एच.पी. कंपनीची गॅस घेऊन येणे होत नसल्यामुळे या शुभम जनरल & गॅस वितरण या एच.पी.गॅस वितरणाचा अनधिकृतपणे मिळणाऱ्या दुकानाचा आधार घेत आहेत मात्र खुलेपणाने हे दुकान असतानाही पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने एक अनधिकृत गॅस चे दुकान सुरू असून या दुकानदाराकडून किमतीपेक्षा शंभर रुपये जादा दराने रक्कम घेऊन गॅस विक्री होत असल्याने अनेक गोरगरिबांची अर्थिक लुट केली जात आहे आणी या महागाईमुळे अगोदरच घरगुती गॅसचे दर हजाराच्या जवळपास गेल्यामुळे नागरिक वैतागलेले आहेत आणि अशातच या दुकानदाराच्या लुटीमुळे नागरिकांची दिवाळीपूर्वीच दिवाळे निघत आहे .
याची सविस्तर माहिती अशी की, येथील लातूर-जहीराबाद या हायवेच्या रस्त्यावर असलेले एक एच.पी. गॅस एजन्सी चे दुकान खुलेआमपणे सुरू असून या दुकानदाराकडे कसल्याही प्रकारचा गॅस वितरणाचा अधिकृत शासनाचा परवाना नसतानाही हे दुकान पुरवठा विभाग यांच्या आशीर्वादाने तसेच निलंगा येथील शिवाजी गॅस एजन्सी यांच्या सहाकार्याने एच.पी. गॅस एजन्सीचा सब डीलर असल्याचे सांगत जवळपास सात ते आठ वर्षापासून हे दुकान औरादसह परिसरातील शेळगी , ताडमुगळी, तगरखेडा, सावरी, हालसी(तु.) अश्या अनेक गावांना एचपी कंपनीचा गॅस पुरवठा केला जातो. त्यामुळे या अनधिकृत चालणाऱ्या दुकानावर प्रशासन मेहरबान असल्यामुळे कसलीही कार्यवाही होत नाही त्यामुळे या दुकानातुन ग्राहकांची अर्थिक लुट केली जात आहे त्यामुळे या दुकानावर प्रशासनाने तात्काळ प्रतीबंध घालावे आणी एच.पी. कंपनीचा घरगुती गॅस पुरवठा औराद व परिसरातील गावांना सुलभ सोयीस्कर पुरवठा वेळेत करण्यात येणे गरजेचं असल्याची नागरीकांची व ग्राहकांची व्यथा आहे.