दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना राजीनामा द्यावा लागल्याने पुन्हा निवडणुकांचे वारे वाहत आहे. यात भारतीय वंशाचे ब्रिटिश नेते ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होण्याची शक्यता वाढली आहे.
कारण मतमोजणीच्या दुसऱ्या राऊंडमध्येही त्यांचं पारडं जड राहिलं आहे. ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदासाठी झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीत आधी त्यांनी मोठी आघाडी घेतली तर आता दुसऱ्या फेरीतही त्यांनी मोठी आघाडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना पहिल्या फेरीत त्यांना सर्वाधिक मते मिळाली असून, दोन उमेदवारही बाद झाले आहेत. पहिल्या फेरीत ऋषी सुनक यांना 25 टक्के मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर पेनी मॉर्डंट यांना 19 टक्के मते मिळाली. एलिमिनेशन फेरीत नदीम जाहवीला सात टक्के आणि जेरेमी हंटला पाच टक्के मिळाले. ही संख्या सर्व उमेदवारांमध्ये सर्वात कमी होती, ज्यामुळे त्यांना बाहेर पडावे लागले. आता ही आघाडी शेवटपर्यंत अशी राहणार का? हेही पाहणं तितकेच महत्वाचे ठारणार आहे.