दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई: ‘द बिग पिक्चर’चा हा एपिसोड या वीकेंडला दाखवला जाणार आहे. या एपिसोडचा पहिला प्रोमोही समोर आला आहे. प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. रोहित शेट्टीचा अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट आणि खुद्द दिग्दर्शक रोहित शेट्टी देखील युद्धपातळीवर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतले आहेत. अलीकडेच रोहित शेट्टी आणि कतरिना कैफ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणवीर सिंहचा शो ‘द बिग पिक्चर’ मध्ये पोहोचले होते. यादरम्यान सर्वांनी मिळून शोमध्ये खूप धमाल केली.
या प्रोमोच्या अगदी सुरुवातीला, कतरिना कैफ रोहित शेट्टीला सांगते की तिने एक महिला केंद्रित पोलिस चित्रपट बनवला पाहिजे. यानंतर, ती खाकी टोपी घालून फिरते आणि दाखवते की ती त्या चित्रपटात परिपूर्ण दिसेल. कतरिना कैफचा हा दबंग अवतार सर्वांनाच पसंत पडतो. मात्र त्यांनतर कतरिना सर्वांनाच चकित करते.
कारण कतरिना चक्क मराठीत धसकेबाज डायलॉग म्हणते. त्याचवेळी रणवीर सिंगकडे जाऊन कतरिना कैफ सिंघम चित्रपटाचा डायलॉग बोलते, ‘मेरे जमीर में दम है इसलिए मेरी जरुरतें कम है’. तेव्हा यावर रणवीर सिंह बाजीराव मस्तानीमधील ‘बाजीराव मैंने बहुत देखे हैं, लेकिन तुझ जैसा मैंने आज तक नहीं देखा.’ हा डायलॉग म्हणते. खरी मजा यानंतर येते.
रणवीरच्या या डायलॉगवर कतरिना कैफने अत्यंत धमाकेदार उत्तर देताना मराठीत म्हटलंय, ‘भाऊ, जे मला नाय महिती ते सांगा’ कतरिनाच्या या डायलॉगला रणवीरकडे उत्तरच नसतं. रोहित शेट्टी आणि रणवीर सह चाहतेही कतरिनाच्या या डायलॉगवर फिदा होतात.