दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – संभाजी गोसावी
फलटण. फलटण ग्रामीण पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये कलम ३०२,३४ या गुन्हेतील फिर्यादी साक्षीदार हे व्यवसायांने ड्रायव्हर व किलन्नर असून ते त्यांच्या मालट्रक घेवुन दि.२०/०१/२०१४ रोजी पहाटेच्या सुमारांस फलटण पंढरपूर रोडवरुन जात असताना वाजेगांव पोस्ट निंबळक ता. फलटण गावच्या एसटी स्टँड जवळ गाडीमध्ये पाणी भरण्यासांठी थांबले असता त्यावेळी चार अनोळखी ही इसामांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम १०.०००/ रुपये व एक मोबाईल हँडसेट जबरदस्तीने चोरून नेल्याबाबतची तक्रारीवरुन वरील प्रमाणे सदरचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांत दाखल झाला होता. गुन्ह्यांच्या तपासातील आरोपी १) गुलजार उर्फ महेंद्र मिस्टीगया काळे वय २२ रा. बावडा जि.पुणे २) गुंफल्या तंबु काळे वय २८ रा. फोंडशिरस जि. सोलापूर ३) जॉकी डारया पवार वय २४ रा. धर्मपुरी जि.सोलापूर ४) लखन डारया पवार रा.धर्मपुरी जि. सोलापूर अशी त्यांची नावे निष्पन्न झाली होती यात मुख्य सूत्रधार आरोपी गुलजार उर्फ महेंद्र काळे डुबल्या छबू काळे जॉकी पवार याला अटक करुन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यांत आला होता. परंतु मुख्य सूत्रधार आरोपी लखन डारया पवार हा सन २०१४ पासून फरार होता तसेच तो वेळोवेळी राहण्यांची ठिकाणे बदलून,तसेच मोबाईलचे सिमकार्ड बदलून पोलिसांना मात्र गुंगारा देत होता. पण फलटण ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे लखन डाराया पवार या आरोपीच्या भर पावसांमध्ये अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या फलटण ग्रामीण पोलिसांच्या कारवाई बद्दल जिल्हा प्रशासनासह परिसरांतून फलटण ग्रामीण पोलिसांचे चांगलेच कौतुक झाले. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक मा. अजयकुमार बन्संल मा. अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलीस अधिकारी मा.तानाजी बरर्डे पोलीस निरीक्षक मा. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.अक्षय सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस अंमलदार सुधाकर सूर्यवंशी दादासाहेब यादव महेश जगदाळे व गणेश अवघडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.