दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – संभाजी गोसावी . सातारा.शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जुना मोटार मंडईच्या परिसरांमध्ये कययुत राजेश खान आत्तार रा.सदर बाजार सातारा यांच्या मालकीचे चिकन सेंटर दिनांक ११/११/२०१ रोजी रात्रीच्या सुमारांस चोरट्यांने फोडून घरफोडी केली होती यांत दुकानांतील रोख रक्कम व मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल चोरुन नेल्यांची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यांत दाखल होती शहापुरी पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि अभिजीत यादव यांच्या पथकाला सदर गुन्हा व उघडकीस आणण्या बाबत सूचना केल्या असता त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस पथक चांगलेच तपासांला लागले असता प्रथम चोरीस गेलेल्या मोबाईलच्या हँडसेट वरुन तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती प्राप्त झाली. सदर प्रकटीकरण विभागांच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडूंन सदरचा घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला तसेच या गुन्ह्यांत अल्पवयीन मुलाचा समावेश असल्यांचे तपासांत निष्पन्न झाले त्यांस पोलिसांनी ताब्यांत घेवुन सदर गुन्ह्यांत चोरीस गेलेला मोबाईल हँडसेट व अजून एक मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ११.०००/ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना हस्तगत करण्यांत यश आले. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल मा.अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे,सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती.आँचल दलाल मॅडम पोलीस निरीक्षक मा.संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागांचे सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, पो. हेड कॉ. हसन तडवी शैलेश फडतडे,अमित माने स्वप्निल कुंभार,पो कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला त्यांच्या या कारवाईबद्दल जिल्हा प्रशासनाकडूंन तसेच परिसरांतून कौतुक