दै. चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा.
जव्हार:- आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका हा डोंगराळ आणि दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो.जव्हार सारख्या आदिवासी ग्रामीण मागास भागातील जनतेला नेहमी आपल्या आरोग्याच्या सुविधांसाठी झगडावे लागते.म्हणून याच भागातील डॉ. प्रविण भोये आणि डॉ.जयश्री भुसारा यांनी स्वतः मुंबई येथे शिक्षण पूर्ण करून आपल्या ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या आरोग्यासाठी कसे चांगले उपचार देऊ शकतो या हेतूने जव्हार शहरात एस.टी बस स्थानकासमोर मातोश्री हॉस्पिटल विक्रमगड विधानसभा संघाचे आमदार सुनिल भुसारा यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले.या हॉस्पिटल मध्ये मेंदूचे विकार,लकवा,मधुमेह,मुतखडा, मलेरिया,दमा,न्युमोनिया,फुफ्फुसाचे व लीवरचे आजार,रक्तदाब आणि डेंग्यू या सारख्या आजारांचे निदान करून उपचार केले जातील.या उद्घाटना प्रसंगी आ. भुसारा यांनी आपण दोन वर्षात केलेल्या लोकपयोगी कामांची माहिती देऊन आदिवासी जव्हार सारख्या ग्रामीण भागात मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली असून लवकरच काम चालू होईल अशी माहिती दिली.या वेळी दोन्ही डॉक्टर यांचे आईवडील सुंदर वसंत भोये आणि देवकी कृष्णा भुसारा यांचा देखील सत्कार करण्यात आला.या उद्घाटन कार्यक्रमात आमदार सुनिल भुसारा,भगवान सांबरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर उपाध्यक्ष व नगरसेवक प्रमोद कोठेकर,शिवसेना जव्हार तालुका प्रमुख श्रावण खरपडे,आय काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष बळवंत गावित,जव्हार नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रियाज मणियार ग्रामीण भागात आरोग्याची सेवा देणाऱ्या डॉ.अनिता पाटील,डॉ.भास्कर कोरडे,डॉ.निशिकांता टोपले तसेच डॉ.भोये व डॉ.भुसारा यांचे नातेवाईक,मित्रपरिवार आणि इतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.