दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची काल सोमवारी राज्यसभेचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आज राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी याबाबतची घोषणा केली.
सांसदीय कामकाज मंत्र्याकडून मला आज एक पत्र मिळाले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाणिज्य व उद्योग, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांची सभागृहाचे नेते म्हणून नियुक्ती केल्याचा उल्लेख आहे, असे नायडू म्हणाले. नायडू यांच्या या घोषणेचे सभागृहातील सर्व सदस्यांनी मेज थपथपवून स्वागत केले. महाराष्ट्रातून सलग तिसर्यांदा राज्यसभेवर निवडून आलेले गोयल याआधीही सभागृहाचे नेते होते.