दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज :- कंधार आगारातून दिवाळी निमित्ताने पेठवडज सर्कल मधील प्रवाशांना बस प्रवाशांची सोय व्हावी म्हणून कंधार-पेठवडज-शिरशी-गोणार-येलूर-मादाळी मार्ग मुखेड जाणारी बस सेवा पुर्ववत चालू करण्यात आली असून पेठवडज सर्कल मधील सर्व प्रवाशांनी या बसने प्रवास करून सहकार्य करावे असे कंधार आगारातून कळविण्यात येत आहे. बसच्या वेळा पुढील प्रमाणे आहेत. सकाळी ८:४५ , दुपारी १:३० , संध्याकाळी ६:३० वा. अधिक माहितीसाठी कंधार आगाराशी संपर्क साधा.