दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे आघाडीवर आहेत. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मते मिळाली. यासह माजी मंत्री कॅमी बडेनोच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
त्यांना 59 मते मिळाली. त्यामुळे केवळ तीन उमेदवार रिंगणात राहिले आहेत. व्यापार मंत्री पेनी मॉर्डाउंट यांना 92 आणि परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांना 86 मते मिळाली. आता पुढील फेरीत सुनक, पेनी मॉर्डाउंट आणि लिझ ट्रस यांच्यात सामना होणार आहे.