
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी:-माधव गोटमवाड
नांदेड:-
नांदेड वाघाळा मनपा सिडको येथील मातृसेवा आरोग्य केंद्रास जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर साहेब यांनी भेट दिली. यावेळी मिशन कवचकुंडलमध्ये सलग रात्रंदिवस ७५ तास अभियान राबवून लसीकरण करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांसह आरोग्य अधिकारी, कर्मचारी व क्षेत्रिय कार्यालय अधिकारी व कर्मचारी तसेच विविध शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी केलेल्या सहकार्यामुळे ईटनकर साहेब यांनी समाधान व्यक्त केले. क्षेत्रीय कार्यालय लवकरच लसीकरणमुक्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ईटनकर यांनी केले.
मिशन कवच-कुंडल अंतर्गत दि. २१ ते २४ ऑक्टोबर दरम्यान नवामनपा अंतर्गत सिडको क्षेत्रीय कार्यालय व मातृसेवा आरोग्य केंद्राच्यावतीने सलग ७५ तास लसीकरण करीत २५ हजारांच्या पुढे लसीकरण करण्यात आले. यावेळी आजूबाजूच्या परिसरातील खाजगी संस्था ,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आरोग्य कर्मचारी व परिचारिका, आशा वर्कर्स व अंगणवाडी मदतनीस, सेविका यांच्या सहायाने हे अभियान राबविण्यात आले. मनपाचे सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त अविनाश अटकोरे, मातृसेवा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्दुल हमीद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक विलास गजभारे, कर निरीक्षक सुधीरसिंह बैस, दीपक पाटील, नागेश ऐकाळे व १२ वसुली लिपीक यांच्यामार्फत तर आरोग्य सहायक सुरेश आरगुलवार व देविदास भुरे, संदीप तुप्पेकर, जयश्री दरेगावे, मीनाक्षी शिंदे, नसरीन पिंजारी, आकाश शिंगे, उल्हास जाधव, विवेकानंद लोखंडे व कर्मचारी यांनी हे अभियान यशस्वी राबविले.