
दै चालु वार्ता वृत्तसेवा
प्रमोद खिरटकर
चंद्रपूर:- प्रतिनिधी
कोरोणा काळात शहरातील शाळा महाविद्यालये बंद होते त्याकरिता विद्यार्थ्यांकरिता चालु असलेल्या महामंडळ बसेस बंद करण्यात आल्या होत्या. काही दिवसापुर्विच शाळा, महाविद्यालये सरकारने पुर्ववत चालु करण्याचा निर्णय घेतला. शाळा चालु होऊनही चंद्रपूर महामंडळच्या बसेस विद्यार्थ्यांकरिता रस्त्याने फिरकल्याच नाही.
करिता देवाळा वेंडली पीपरी भारोसा भोयगाव कवठाळा इरई गावातील विद्यार्थ्यांनी युवा स्वाभिमान पार्टी सर्कल अध्यक्ष निखिल पिदुरकर यांच्याकडे धाव घेतली.
शिक्षणासाठी चंद्रपूर ला ये-जा करतांना अडचण होत असल्याचे विद्यार्थ्यानी निखिल पिदुरकर यांच्याकडे समस्या मांडली. त्यांनतर सर्कल अध्यक्ष निखिल पिदुरकर यांनी विद्यार्थ्यांना घेऊन थेट चंद्रपूर आगार गाठले आणि विध्यार्थीची समस्या निवेदनामार्फत आगार प्रमुखाकडे सोपवली.
त्यानंतर आगारप्रमुखांसी निखिल पिदूरकर यांनी चर्चा केली असता कोरोना काळात शाळा महाविद्यालये बंद असल्या कारणाने बसेस बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता सर्व अडचणींचे निराकरण करत दोन दिवसात बस सेवा पुर्ववत चालू करणार असा शब्द आगारप्रमुखांनी युवा स्वाभिमान पार्टी चे कोरपणा पंचायत सर्कल अध्यक्ष निखिल पिदूरकर यांना दिला.