दैनिक चालु वार्ता अहमदपूर प्रतिनिधी-
तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या मौजे सय्यदपुर खु. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची नुकतीच अटीतटीची निवडणुक झाली त्यामध्ये माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी तेरा पैकी तेरा जागा जिंकून विद्यमान आमदार यांच्या समर्थकांच्या पॅनलचा चक्काचूर केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते सय्यदपुर खु.येथील सेवा सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार
येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाला. सदरील सत्कार सोहळ्यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी सभापती अँड.आर.डी.शेळके, रामभाऊ बेल्लाळे, अँड.अमित रेड्डी, गोविंदराव गिरी, राजकुमार खंदाडे, बबनराव नवटक्के, देविदास सुरनर,
सुखदेव कदम, संगम कुमदळे, यांच्या सह सय्यदपुर खु.चे नवनिर्वाचित सोसायटीचे संचालक शिवाजी औराळे, रघुनाथ कानवटे, तुकाराम कानवटे, मारोती कानवटे, सुभाष पार्सेकर, वसंत पांचाळ, मच्छिंद्र कानवटे, नरसिंग कानवटे,देऊबाई कानवटे, मुक्ताबाई औराळे, धोंडीबा नामवाड, नारायण नकुलवाड,माधव औराळे यांच्या सह नागनाथ कानवटे, बाळासाहेब आकनगिरे, त्र्यंबक आकनगिरे,दगडू कानवटे,ज्ञानोबा कानवटे, नारायण कानवटे, नारायण ताडमे,सुर्यकांत औराळे,माधव कानवटे ,पंडूसेट कानवटे,नाथराव ताडमे, ज्ञानोबा गडमेयांच्या सह सय्यदपुर खु.येथील ग्रामस्थ उपस्थित होते.