
दैनिक चालू वार्ता
जालना जिल्हा प्रतिनिधी
नितीन भदर्गे
सोयबिन खरेदी व्यापाऱ्यांच्या हातचलाखीने शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव ठरत असून केवळ बटन दाबून सोयबिनची प्रतवारी ठरवण्यात येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.
व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी या मागणीचे निवेदन
येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन चवडे यांनी शुक्रवारी ता.22 रोजी येथील तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परतूर तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने सोयबिन काढणीला वेग आला असून शेतकरी व्यापारी वर्गाकडे सोयबिन विकत आहे.दरम्यान सोयबिन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यां कडून आद्रता मोजनाऱ्या मशीनवर हातचलाखी करून भाव ठरवला जात आहे. यात शेतकऱ्यांना कमी भाव दिला जात आहे.या होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली. आहे.निवेदनावर गजानन चवडे,कृष्णा सोळंके,गणेश ढवळे, बाबासाहेब अभुरे,योगेश मुळे,सुरेश सुरुंग आदींच्या सह्या आहेत.
गजानन चवडे पाटील
कृष्णा सोळंके
गणेश ढवळे
बाळासाहेब अंभूरे
सुरेश सुरुंग