
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई-योगेश्वरी महाविद्यालयात आज दि. 26-10-2021 रोजी मिशन युवा स्वाथ्य कवचकुंडल कोविड -19 लसीकरण शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ आर. डी. जोशी हे होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बाळासाहेब लोमटे तालुका हेल्थ ऑफिसर आंबेजोगाई हे लाभले तसेंच महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ आर. व्ही. कुलकर्णी , कार्यालयीन अधीक्षक श्री. अजय चौधरी, आय क्यू ए सी चे विभाग प्रमुख डॉ व्ही एस हमदे डॉ. अनिल नरसिंगे , डॉ जी. डी. सूर्यवंशी, डॉ. एस डी घण हे कार्यक्रमाला उपस्तित होते. लसीकरनामध्ये सौ आशा अडसूळ , सौ खरटमोल किरण व नदीम खान यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. या शिबिरामध्ये एकूण 52 मुला-मुलींचे लसीकरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी डॉ महेंद्र आचार्य, डॉ सारिका संगेकर , डॉ संतोषकुमार सुर्वे श्री नंदकुमार बलुतकर, राजू सोळंके यांनी प्रयत्न केले . तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयं सेवक भाग्येश बलुतकर, दिनेश बारगुले ,चैतन्य साळुंके, स्वप्नजा शिंदे, वृषाली जगताप, प्रतिभा पवार, तनया वाघमारे, ऋतुजा सेलूकर व माधुरी अभंग यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले .
कार्यक्रमाची सांगता प्रा. संतोषकुमार सुर्वे यांनी आभार व्यक्त करून केली.