दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डप्रकरणी गांधी कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. गेल्या महिन्यात राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली. तसेच, आता सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
कालची त्यांची चौकशी संपली असून पुन्हा २५ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, ईडी चौकशी संपल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्या म्हणाल्या की, मी इंदिरा गांधी यांची सून असून कोणालाही घाबरत नाही. हा व्हिडिओ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ट्विट केला आहे.
ईडी विरोधाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रासह देशातील काही भागांत काँग्रेसकडून आंदोलनं केली जात आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. सोनिया गांधींच्या समर्थनार्थ देशव्यापी निषेधाचा भाग म्हणून जम्मू काश्मीरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे.