
दै. चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी
आप्पासाहेब चव्हाण
हातोला येथील शेतकरी श्री सुधीर चव्हाण यांचे शेतात काढून ठेवलेले सोयाबीन चे पीक अज्ञात माथेफिरू ने पेटवून दिले. त्यात अंदाजे अडीच लाखाचे सोयाबीन जळून खाक झाले. हि घटना मंगळवारी(दि.26) रात्री 8:30 वा.घडली.
सुधीर चव्हाण यांचे हातोला शिवारात शेत आहे. त्यांच्या चार एकर शेतातील सोयाबीन काढून शेतात ढीग रचून ठेवले होते. अज्ञात माथेफिरू ने मंगळवारी रात्री 8:30 वा. तो ढिग पेटवून दिला. त्यात संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले. आधीच अतिवृष्टीने सोयाबीनचे पीक गेले आहे आणि आता उरलेल पीकही जतन करुन ठेवले होते तेही जळून खाक झाले.अंदाजे अडीच लाखाचे सोयाबीन जळून खाक झाले.सुधीर चव्हाण यांचा पूर्णपणे शेतीवरच उदरनिर्वाह चालतो. तोंडाचा घास जळून खाक झाल्याने, अतोनात नुकसान झाल्याने ते अतिशय दुःखी व हतबल झाले आहेत.