
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांर्गत अस्तित्वात असलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरूस्ती करून ती त्रुटी विरहित करण्याचा व दिनांक १ जानेवारी या अर्हता दिनांकानूसार नवीन मतदार नाव नोंदणी करून मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येतो. चालू वर्षीच्या पुनरिक्षण कार्यक्रमांमध्ये १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारे नवीन मतदार यांची नोंदणी करून मतदार यादी सुधारित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचावा याकरिता प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांनी अप्पर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग यांना केलेली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना असे निर्देश देण्यात येत आहेत की, त्यांनी दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ रोजी संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे. सदर विशेष ग्रामसभेमथ्ये गावातील मतदार यादीमधील नोंदणी मध्ये दुरूस्ती, नवीन मतदार नोंदणी प्रक्रिया गावातच उपलब्ध करून देण्यात यावी असे भारत निवडणूक आयोगाकडून विनंती करण्यात आली आहे. तरी पेठवडज सर्कल मधील नवीन मतदार नोंदणी व काही दुरूस्ती करावयाची असल्यास करून घ्यावी.