दैनिक चालू वार्ताप्रतिनिधी -संभाजी गोसावी
सातारा. सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष आणि सातारकरांशी गेले दोन वर्षापासून चांगलेच नातं बनवणारे आणि सर्वांशी मन मिळून ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये उत्कृंष्ट आपल्या सर्व महसूल प्रशासनाला हाताशी घेवुन काम करणारे आणि माझ्या गडचिरोली जिल्ह्यांपासून माझ्या संपर्कातील सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बदली झाली मात्र त्यांची बदली कोणत्या पदावर झाली हे मात्र गुलदस्त्यांत आहे. तर त्यांच्या जागी राज्य बियाणे महामंडळ अकोल्याचे विस्थापकीय संचालक म्हणून काम पाहणारे नवीन जिल्हाधिकारी आणि अत्यंत काटेकोर आणि प्रशासकीय शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची भारतीय प्रशासकीय विभागांमध्ये ओळख आहे.श्री.रुचेस जयवंशी यांची सातारा जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यांत आली. ते २००९ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत त्यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे अकोला येथील वस्थापकीय संचालक तर हिंगोली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी सेवा बजावली होती तसेच राज्यांचे महिला बालकल्याण आयुक्त म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा चांगलाच ठसा उमटवला होता. सातारा जिल्ह्यांचे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मार्च २०. २०२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी सौ. श्वेता सिंघल मॅडम यांच्याकडूंन त्यांनी सातारा ऐतिहासिक जिल्ह्यांचा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारुन काही कालावधीनंतर कोरोना महामारीचे संकट जिल्ह्यांवर आले होते या महामारीत महसूल विभागांचे यंत्रणा हातांशी घेऊन अत्यंत त्यांनी महामारीचा धैयांने मुकाबला केला. जिल्ह्यांतील पुनर्वसनांचे प्रश्नंन तसेच विविध विकास योजना जंम्बो कोविड हॉस्पिटल, अतिवृष्टीतांना, भुखनम्रग्रस्तांना मदत आदी महत्त्वाच्या प्रसंगी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सातारा जिल्हा वासियांना जास्तीत जास्त मदत केली सातारा शहराची हद्दवाढ डीपीडीसी मधील निधी संदर्भातील विविध स्त्रोतांचे बळकटीकरण यांचे मंत्रालयांत सादरीकरण करणारे साताऱ्यांचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून शेखर सिंह यांची चांगलीच ओळख होती. त्यांच्या कार्यपद्धती नेहमीच वाखाणली गेली राज्यस्तरांवर साताऱ्यांचे उत्कृंष्ट जिल्हाधिकारी म्हणून सुद्धा त्यांचा नावलौकिक झाला होता. त्यांच्या बदलीमुळे सातारकर चांगलेच भावुक झाले आहेत. तर साताऱ्यांचे नूतन जिल्हाधिकारी श्री.रुचेश जयवंशी हे सोमवारी संध्याकाळपर्यंत तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडूंन सातारा जिल्ह्यांचा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार असल्यांची माहिती पत्रकार संभाजी गोसावी यांना दूरध्वनीच्या माध्यमांतून नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.