दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
100% विधार्थी प्रथम श्रेणीत
हंगरगे नीलेश ९७ % गुण घेवून शाळेतून प्रथम तर
शताक्षी बिरादार ९६% गुण घेवून मुलीत पहिली
देगलूर:केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड नवी दिल्ली (CBSE) तर्फे १०वी च्या मुलांच्या एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचा निकाल १००% लागला असून दरवर्षप्रमाणे या ही वर्षी यशाची उज्ज्वल परंपरा शाळेनी राखली आहे. शाळेची सर्व मुले प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ५२ विध्यर्थांनी परीक्षा दिली. त्यामध्ये हंगरगे नीलेश या विध्यार्थ्याने ९७% गुण शाळेतून प्रथम येण्याचा मन मिळवला तर शताक्षी बिरादार या मुलीने ९६ % गुण घेवून शाळेतून द्वितीय आली. तर गदिया सम्यक, नरुटे सन्नी हे ९४% व संगनगीरे ऋषिकेश ९४% गुण घेवून तृतीय स्थानावर राहिले. विठाळकर ओम ९३% व मानले सागर ९३% पाचव्या स्थानावर राहिला. एकूण मुलांपैकी ९५% च्या वरी मार्क घेणारे २ मुले, ९०% च्या वरी मार्क घेणारे ११ मुले व ७५% पेक्षा जास्त मार्क घेणारे ३३ मुले असे घवघवीत यश मुलांनी मिळवले. विशेष करून पहिल्या १० मध्ये शाळेच्या होस्टेलची ९ मुले गुणवत्ता यादीत.
विषय वाइज निकाल पाहता हिन्दी मध्ये ९९% चा १ विध्यर्थी व गणित विषयात ९९ % ची २ विध्यार्थी तर ९८% मार्क घेणारे हिन्दी मध्ये ३ विधार्थी व गणिता मध्ये ३ विधार्थी. विशेषता हिन्दी विषयामध्ये ९० % च्या वरी २४ विध्यार्थी तर SST विषयात १५ विधार्थी मार्क घेवून घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश बिरादार, सुयश बिरादार, सुजीत बिरादार, प्राचार्या पल्लवी जगताप, व्यवस्थापक रामेश्वर सगरे, शिक्षक आम्रपाली सरवदे, रामेश्वरी कदम, रेशमा देशमुख, पवार ज्योतिराम, किरण देशपांडे, आदी शिक्षकासह इतर कर्मचार्यांनी कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश बिरादार सराणी शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमामुळे विध्यर्थ्यांनी यश संपादन केले आहे त्यामुळे शिक्षकांचे व विध्यर्थ्यांचे कौतुक केले. व पुढील येणार्या वेगवेगळ्या परीक्षेसाठी व आव्हानासाठी शुभेच्या दिल्या. मुलांनी यावेळी आपले मत मांडताना शाळेंनी अवलंबलेल्या सवंय अध्ययन पद्धतीचा आम्हाला चांगला फायदा झाला असे मत व्यक्त केले.