दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
““”””””””””””””””””””””””””””””””””'”””””””
परभणी शहरापासून काही अंतरावरील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडाळा शिवारात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. तथापि या मृतदेहाबाबत अनेकजण शंका- कुशंका व्यक्त करीत आहेत त्यामुळे हा अपघात की घातपात, हे अद्याप कळून न आल्यामुळे पोलीस तपासानंतरच खरे चित्र काय असू शकेल ते स्पष्ट होईल.
ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंगणापूर ते खडाळा या परिसरातील शिवारात गुरुवार, दि. २१ जुलै २२ रोजी दुपारच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला. मूळचा मौजे तिजलापूरचा तो तरुण असला तरी विद्यमान कालावधीमध्ये तो परभणी शहरात राहात असल्याचे बोलले जात आहे. मयत तरुणांचे नाव कृष्णा कदम असल्याचे त्यांच्या जवळील काही पुराव्यांमुळे समजल्याचै कळते. दरम्यान हा अपघात आहे का घातपात, याविषयीया चर्चेला मात्र तालुका व जिल्ह्यात सर्वत्र उधाण येतं आहे. पोलीस तपास सुरू असून सत्यता काय असावी, हे तपासाअंतीच कळून येईल एवढे निश्चित.