दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
राजकीय आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या मोर्चामुळे परभणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नानलपेठ पोलिसांकडून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीतर्फे शहरातील शनिवार बाजार मैदानातून राजकीय आरक्षणासाठी नुकताच मोर्चा काढण्यात आला होता. तथापि या मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात येऊन नानलपेठ पोलिसांकडून याप्रकरणी संघर्ष बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी शहराबरोबरच राज्यात व देशातही या मागणीसाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात मोर्चे काढण्यात आले होते. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा ओबीसी आरक्षणाविषयी सकारात्मक भूमिका घेत न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे मागील बर्याच कालावधीपासून प्रलंबित राहिलेला हा प्रश्न निकाली निघाला असल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होणे स्वाभाविक आहे.