दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
औरंगाबाद–वाढदिवसाच्या निमित्ताने अवांतर खर्च न करता वाळूज महानरातील समाजसेवक महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त व्यंकट मैलापुरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यामध्ये वृक्षारोपण, सावली मुलींचे बालगृह येथे अनाथ मुलींना जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.यावेळी व्यंकट मैलापुरे, गिरीधर गायकवाड, प्रफुल्ल कांबळे, सतीश नेव्हल,आय जी जाधव,भरत सलामपुरे,संतोष देशमुख संकेत मैलापुरे,मनीषा गजभार, प्रतिभा धालगडे, आश्रमाचे संचालक श्रीकांत देशमुख, विद्यार्थीनी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.