दैनिक चालू वार्ता मोलगी प्रतिनिधी -रविंद्र पाडवी
मोलगी = मोगरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने पशु वेगवेगळ्या साथीच्या आजाराने मृत्यू होत आहे.अनेक दिवसांपासून सुरू असलेला पशु मृत्यू थांबता थांबेना व पशु संवर्धन विभागाने पशु वैद्यकीय सेवा पुरवणे अति आवश्यक आहे. व होती परंतु पशुसंवर्धन विभागाने कुठल्याही प्रकारची आजतागायत सेवा दिली नाही.व लसीकरण ही केले नाही.व येथिल पशु मालकांना हे ही माहित नाही की या परिसरातला वैद्यकीय अधिकारी कोण आहे. मोगरा गावात मागील अनेक दिवसांपासून पशु मृत्यू झाला आहेत त्यातील जाहग्या अमद्या राउत यांचा एक बैल,तिज्या बामण्या वसावे यांचा एक बैल,दमण्या रोता वसावे यांचा एक बैल,बाज्या धर्मा पाडवी यांचा एक बैल,दातक्या गिंब्या वसावे यांची एक गाय व भांगा गोवल्या वसावे यांची दोन गायी व एक बैल आणि इंद्या बासरा वसावे यांचा एक बैल असे परिसरातील नागरिकांचे अनेक पशु दगावले आहेत.परंतु प्रशासकीय पातळीवर सदर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे.पशु संवर्धन विभागाने या गावातील व परिसरातील नागरिकांच्या जनवारांना योग्य वेळी. उपचार मिळणे गरजेचे आहे.व येशील पशुंना लसीकरण करणे अति आवश्यक आहे. असे महाराष्ट्र राज्य आदिवासी टाईगर सेना संघटनेचे. राज्य युवा अध्यक्ष श्री. साया वसावे पशु मालकांची संवाद साधतांना ही विदारक स्थिती समोर आली.