दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी-
मंठा
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या जालना तालुका कार्यकारणी च्या वतीने मंठा येथील तहसीलदार श्री कैलाश चन्द्र वाघमारे यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व निलंबित करावे. अशी मागणी करण्यात आली.
वाळू साठा करणाऱ्यांवर आपण काय कार्यवाही करणार आहात असे प्रश्न विचारले असता तहसीलदार यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जालना अध्यक्ष नंद यांना आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून अपमान केला यामुळे मा. जिल्हाधिकारी साहेबाना संघटनेच्या वतीने निवेदन वाजा तक्रार सादर करण्यात आली. तहसीलदार यांच्या गुंड प्रवृत्तीचा तीव्र निषेध करण्यात आला. मा.निवासी उप जिल्हाधिकारी श्री केशव नेटके साहेबांनी या घटनेची त्वरित चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या निवेदनावर तालुका अध्यक्ष महेश नंद, मिलिंद जहागीरदार,राहुल करणाडे, विलास सहाणे, अकबर अन्सारी, जरीन अन्सारी, गणेश शिंदे ,द्यानेस्वर उबाळे, सुनील कुळकर्णी,आदींनी स्वाक्षरी करून कार्यवाही न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असे संघटनेच्या वतीने सांगितले.