
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर: देगलूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक शनिवार दिनांक 30 ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे जिल्हा प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडून विशेष निशुल्क बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
देगलूर बिलोली हे दोन तालुके वगळता उर्वरित 14 तालुका मुख्यालयातून दिनांक 28 ऑक्टोंबर रोजी सकाळी देगलूर येथे निवडणुकीच्या कर्तव्यावर जाण्यासाठी तालुक्याच्या एस.टी. स्थानकावरून विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्यात आले आहेत 30 ऑक्टोंबर रोजी मतदानाची कारवाही संपल्यानंतर देगलूर येथील आपापल्या तालुका मुख्यालयात परत जाण्यासाठी विशेष बस उपलब्ध केल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिली आहे.
नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने सदर बस सेवेचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर इटनकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.