
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई – काही दिवसांपूर्वी तर विकी कौशलनं गुपचूप साखरपूडा केल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता चर्चा त्यांच्या गाडीच्या नंबरप्लेटची आहे. त्यांच्या गाडीच्या नंबरप्लेटचा फोटो एका चाहत्यांनं व्हायरल केला आहे. त्यामुळे त्या नंबरमागील गुपीत नेमकं काय आहे असा प्रश्न या दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांनी विचारला आहे.
अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे दोन्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेले सेलिब्रेटी आहेत.
त्यांची लोकप्रियताही मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु आहे.
विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्याला चाहत्यांची पसंतीही मिळाली आहे. आता तर विकीनं या वर्षी आपण साखरपूडा करणार असल्याचेही सांगितले होते. त्यानं त्याच्या सरदार उधम या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी ही गोष्ट सांगितली होती. अशाप्रकारे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तबही झाले होते. आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती त्यांच्या लग्नाची. त्यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिल्याचे कळते आहे.
विकी आणि कॅटरिनाच्या एका चाहत्यानं त्यांच्या कारच्या नंबरप्लेटचे फोटो व्हायरल केले आहेत. त्या नंबरमागील गुपीत काय असा प्रश्न यानिमित्तानं चाहते विचारत आहेत. नुकतेच हे दोन्ही सेलिब्रेटी एका कामानिमित्तानं बांद्र्यातील एका ऑफिसमध्ये आले होते. त्यावेळी त्या दोघांच्या कारच्या नंबरप्लेटनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. विक्कीच्या काळ्या रंगाच्या गाडीचा क्रमांक 7722 असा होता तर कॅटरिनाच्या कारचा नंबर 8822 असा होता. त्याचे दोन्ही फोटो एकानं सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. विकीच्या सध्याच्या प्रोजेक्टविषयी सांगायचं झाल्यास त्याच्या सरदार उधमला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्यावेळी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.