
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळाल्यामुळे आता पाकिस्तानचा सेमी फायनलला पोहोचण्याचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. आता पाकिस्तानचे अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया यांच्याशी मॅच बाकी आहेत. त्यांचा या स्पर्धेतील फॉर्म पाहता या मॅच जिंकणे पाकिस्तानला अवघड जाणार नाही. टीम इंडियाच्या आता न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया यांच्याशी लढत बाकी आहे.
आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही ग्रुपमधून टॉप 2 टीम सेमी फायनलला जाणार आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ग्रुप 2 मधून टीम इंडिया आणि न्यूझीलंड या टीम सेमी फायनलसाठी प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.मात्र त्यांना पाकिस्तान विरुद्ध पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे या ग्रुपमधील सेमी फायनलची लढाई रंगतदार बनली आहे. पाकिस्ताननं न्यूझीलंडला पराभूत केल्यानं टीम इंडियाचा मार्ग सोपा होणार आहे. कारण आता न्यूझीलंडवरही रविवारच्या मॅचमध्ये जिंकण्यासाठी दबाव असेल.
रविवारी न्यूझीलंड विरुद्ध होणारी लढत ‘करो वा मरो’ स्वरुपातील आहे. न्यूझीलंडनं मंगळवारी पाकिस्तानचा पराभव केला असता तर टीम इंडियाची डोकेदुखी वाढली असती. आता टीमला न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर सेमी फायनलचा पुढील मार्ग सोपा होणार आहे. त्यामुळे पाकिस्ताननं न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाला एकप्रकारे मदत केली आहे. पाहा टीम इंडियाचे उर्वरित सामने 31 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड सायंकाळी 7: 30 वाजता 3 नोव्हेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान सायंकाळी 7: 30 वाजता 5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध स्कॉटलंड सायंकाळी 7: 30 वाजता 8 नोव्हेंबर- भारत विरुद्ध नामिबिया सायंकाळी 7: 30 वाजता