दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा – राष्ट्रीय महामार्गावर असलेले लोहा शहर याठिकाणी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलिस भरती सैन्य भरतीची तयारी करतात पण लोहा येथील क्रीडा संकुलात घाणीचे साम्राज्य पहावस मिळत आहे याची प्रशासनाने तातडीने पाहणी करुन सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शिवसेनेचे लोहा – कंधार विधानसभा संघटक मिलिंद पाटील पवार यांनी केली आहे.
लोहा शहरात असलेल्या क्रीडा संकुलात शहरी व ग्रामीण भागातील सैन्य भरती, पोलिस भरतीसाठी विद्यार्थी विद्यार्थिनी येतात यामध्ये अनेक सुविधांचा अभाव असुन यामध्ये आवश्यकतेनुसार 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान, कुस्ती, शूटिंग रेंज, जिम्नॅस्टिककरीता सुविधा आदींचा समावेश करावा. क्रीडा संकुलात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करावा करून रंगकाम करावे व स्वच्छतागृह आदि सुविधेचा अभाव आहे व त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने लोह्यातील क्रीडा संकुल घाणीचे साम्राज्य बनले असल्याचे मत लोहा – कंधार शिवसेना संघटक मिलींद पाटील पवार यांनी व्यक्त केले प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे व सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे.