
दै चालु वार्ता
प्रमोद खिरटकर
चंद्रपूर – प्रतिनिधी
कोरपना येथून जवळ असलेल्या पिपरडा येथे कोरोना कालावधीनंतर प्रथमच वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये मागील अहवाल वाचून कायम करणे नवीन कामाची निवड करणे तंटामुक्त समितीचे पुनर्घटन तसेच पेसा अंतर्गत समितीचे पुनर्घटन करण्यात आले ग्रामसभेमध्ये विविध विषयावर व्यापक चर्चा करण्यात आली तसेच विकास कामाचे ठराव पारित करण्यात आले ग्रामसभेमध्ये 14 वित्त आयोग अंतर्गत व कालावधीमध्ये नाली बांधकाम कोरोना मानधन नाली सफाई इत्यादी कामावर यावर चार लाख एक हजार रुपये खर्चावर सामाजीक कार्यकर्त आबिद अलीयांनी आक्षेप घेतला कामाची चौकशी करून पुढील सभेमध्ये अंदाजपत्रक एम बी तसेच काम झाले नसताना खर्च कसा झाला याबाबत संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर करा अशी मागणी नोंदविली तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समिती करिता अध्यक्षपदावर देवराव कुळमेथे यांचे नाव आबिद अली यांनी सुचविले सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली पेसा अंतर्गत साधन संपत्ती नियोजन समिती अध्यक्ष म्हणून शत्रुघन आत्राम तसेच सामाजिक न्याय समिती वर अध्यक्ष म्हणून गोविंदा कुळमेथे यांची निवड घोषित करण्यात आली यावेळी प्रशासक श्री दुधे कृषी वि अधिकारी ग्रामसेवक शेंडे यांचे सह ग्रामस्थ मोठया सख्येनी . उपस्थीत होते सभेचे कामकाज शांततेत पार पाडल्याबद्दल विस्तार अधिकारी तथा ग्रामपंचायत प्रशासक यांनी सर्वांचे आभार मानले व गुहकर पाणीपट्टी कर वेळीच भरणा करून को बीड नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले समितीत निवड झालेल्या अध्यक्षांचे अभिनंदन करण्यात आले.