दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी
ओयासिस ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट वर्ल्ड रिकॉर्ड दिल्ली अंतर्गतं दिला जाणारा इंडियन आयकॉन ऑवार्ड 2022 महाराष्ट्रातील लातूर येथील ग्रामीण कवी गणेश तुकाराम पुंडे यांना जाहीर झाला अशी माहिती डॉ सुषमा सी ई ओ प्रेसिडेंट ऑफ ओयासिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन च्या अध्यक्षा
तथा सी ई ओ डॉ सुषमा शरावत यांनी दिली.
विविध क्षेत्रातील उल्लेखणीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा सन्मान ओयासिस वर्ल्ड कडून करण्यात येतो हा सन्मान् 15 ऑगस्ट 2022 रोजी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे या पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
नुकताच त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न सन्मान जाहीर झाला आहे.सामान्य परिस्थितीत अडचणीवर मात करत यशाची शिखरे सर करणारे कवी गणेश पुंडे यांचा जीवन प्रवास युवा प्रेरणादायी व्याख्याते राजेश दिवटे यांनी झिरो ते हिरो एक प्रवास या पुस्तकात मांडून पुरस्कृत केल आहे .सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात कार्य करणारे ग्रामीण कवी गणेश पुंडे हे नाव नक्कीच प्रेरणादायी आहे. डॉ सुषमा सी ई ओ प्रेसिडेंट ऑफ ओयासिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन् च्या अध्यक्षा डॉ सुषमा यांनी गणेश पुंडे यांचं अभिनंदन केल आहे.