दै चालु वार्ता वृत्तसेवा
प्रतिनिधी :अरुण भोई दौंड
दौंड तालुका भारतीय जनता पार्टीची मुख्य कार्यकारिणी, इतर मोर्चे व आघाड्यांची कार्यकारिणी नुकतीच दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांचे उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे यांनी जाहीर केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणानुसार दौंड तालुक्यातील मुख्य कार्यकारिणी, किसान मोर्चा, ओ. बी. सी.मोर्चा, युवा मोर्चा, वाहतूक आघाडी व विद्यार्थी आघाडीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. तालुका चिटणीस भारत खराडे,
किसान मोर्चाच्या सदस्य महादेव बगाडे,ओ. बी. सी. मोर्चाच्या सदस्य संतोष जगताप, वाहतूक आघाडी सल्लागार प्रमोद मेंगावडे तर दौंड तालुका विद्यार्थी आघाडी सदस्य कुलदीप गुणवरे, राजेश मोघे,यांची निवड करण्यात आली आहे.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार राहुल यांनी तसेच पुणे जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष कांचन कुल यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील नागरिकांच्या पर्यंत पोहचविणार असल्याचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर उर्वरित आघाड्या लवकरच जाहीर करणार असल्याचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे यांनी सांगितले आहे.
प्रसंगी यावेळी राजेगाव या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा झाला यावेळी ,मा रासप तालुकाध्यक्ष सचिन खैरे यांनी मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.यावेळी गटनेते व ग्रामपंचायत सदस्य मुकेश गुणवरे, मा उपसरपंच नवनाथ लोंढे, राजेश्वर सोसायटी मा चंद्रकांत मोरे, महाराष्ट्र पोलीस अजिज शेख,प्रगतीशील बागादार भारत भोसले,मा ग्रा पं सदस्य जनार्दन भोसले, बाळासाहेब मोरे, रंगनाथ जाबंले .राजेश्वर वि.वि.सोसायटी सदस्य अमोल मोरे,मा उपसरपंच महेश कडू ,मा तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढमे, अविनाश काळे,नंदु मोरे,सुनील (बप्पा)मोरे,व नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते.