
दैनिक चालू वार्ता
पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
बेमुदत आमरण उपोषणाचा दुसरा दिवस सम्पला परन्तु अजूनही प्रश्न कायम आहेत.मागण्या पूर्ण करण्यावर पात्रताधारक ठाम आहेत.
************************
दि. २७,पालघर- मुख्य कार्यकारी अधिकारी पालघर यांच्या कार्यालय समोर आदिवासी डीएड,बीएड कृती समितीचे २६ ऑक्टोबर पासून बेमुदत आमरण उपोषण चालू झाले आहे.पहिल्या दिवशी शिक्षणाधिकारी लता सानप यांनी संध्याकाळी उपोषण कर्त्यांची भेट घेतली.परन्तु कुठलाही तोडगा न काढू शकल्यामुळे त्यांचे प्रयत्न फेल गेले.प्रशासन स्तरावर चुकीची माहिती देणे,पवित्र पोर्टलचा अटहास धरणे,पेसा कायदा अंमलबजावणी, राज्यपाल अधिसूचनेचा अवमान,आरक्षण कायद्याची पायमली,कार्यालय कडून काय पाठपुरावा झाला यावर त्यांनी उलट सुलट उत्तरे दिल्यामुळे डीएड,बीएड पात्रता धारक खूपच संतापलेले पहायला मिळाले.
३१ डिसेंबर २०१९ पर्यन्त विभागीय कोकण आयुक्त यांनी तपासून दिलेली अनुसूचित जमातीची बिंदूनामावली मध्ये शिक्षकांच्या १६६२ रिक्त जागा दाखवल्या असताना शासन स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाठविलेल्या विशेष शिक्षक भरती प्रस्तावावर १४६८ जागाच का दाखवल्या म्हणजे तुम्ही १९४ जागा विकून खाल्या आहेत का? मग आमच्या सर्वच जागा विकून खाव्यात असा सवाल उपोषण कर्त्यांची केल्यावर त्या ठिकाणावरून त्यांनी पळ काढला.
दुसऱ्या दिवशी ५ वाजेपर्यंत एकही प्रशासकीय अधिकारी फिरकला नाही.बेमुदत आमरण उपोषणास बसलेल्या सदस्यांपैकी सर्व सदस्यांची प्रकृती खालावत चालली असल्याचे समितीचे सल्लागार विवेक कुरकुटे यांनी कळविले आहे.जो पर्यंत अनुसूचित जमाती (पेसा क्षेत्र) विशेष शिक्षक भरतीच्या प्रस्तावावर शालेय शिक्षण विभाग व वित्त विभागाची मंजुरी घेऊन भरती होत नाही तो पर्यंत उपोषण कर्ते ठाम आहेत.
“बेमुदत आमरण उपोषण करणाऱ्या आमच्या सदस्यांना काही इजा झाल्यास व मागण्या पूर्ण न झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.”
दामू मौळे,अध्यक्ष