
दै .चालू वार्ता
लातूर प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत लोक नृत्य भारत भारतीचे आयोजन
8 राज्यांचे लोक कलाकार समूह विविध पारंपरिक लोकनृत्ये सादर करतील
“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केन्द्र, नागपुर, सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार आणि भाषा आणि संस्कृती विभाग, तेलंगणा यांनी “सरदार वल्लभभाई पटेल”यांच्या जयंती निमित्त दिनांक 30 आणि 31 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 4 वाजता “लोक नृत्य भारत भारती” चे आयोजन केले आहे.
दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी पी. स्वामी यांचे जड़ाकोप्पू कोलाटम (तेलंगणा ), के. उप्पलय्या यांचे चीरूतला रामयमम (तेलंगणा), कुंतला रमेश यांचे ओग्गु ढोलु (तेलंगणा ), तबस्सुम रेहमान यांचा रौफ डांस (कश्मीर), मनीष यादव यांचे बरेदी नृत्य (मध्य प्रदेश), एच. गुना मंगांग यांचे पुंग चोलम (मणिपुर) आणि ए. के. महालक्ष्मी यांचे कोलाटम (आंध्र प्रदेश)या नृत्यांचे सादरीकरण होईल.
दि. 31 ऑक्टोबर 2021 रोजी जी. नीला यांचे बोनाला कोलाटम (तेलंगणा), एम. लक्ष्मय्या यांचा डप्पू डांस (तेलंगणा), डॉ. बाळासाहेब लक्ष्मण मंगसूले यांचा धनगरी ढ़ोल (महाराष्ट्र), मुश्ताक़ अहमद भटयांचे डम्बाली नृत्य (कश्मीर), एच. गुना मंगांग यांचे ढ़ोल चोलम (मणिपुर), अमोलदास टंडन यांचे पंथी नृत्य (छत्तीसगढ़) आणि एस. कंतालगेरे यांचे सोमन कुनिथा (कर्नाटक) नृत्यांचे सादरीकरण होईल.
दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात 8 राज्यांचे लोक कलाकार समूह हे विविध पारंपरिक लोक नृत्ये सादर करतील. हा कार्यक्रम तुम्ही खालील YouTube लिंक वर पाहू शकता .
https://www.youtube.com/user/sczcc त्याचबरोबर Facebook आणि twitter वरही या कार्यक्रमाची लिंक तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध असेल.