
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी माकणी
गणेश विठ्ठलराव मुसांडे
उस्मानाबाद: औसा-तुळजापूर रोडवरील उजनी मोड येथे रवी हॉटेल समोर नांदेड – तालिकोट (KA 28 F 2454) या क्रमांकाची एसटी बस ST Bus तालिकोट येथे जात असताना उजनी मोड येथे हॉटेलवर फुकट मिळणार जेवण नाश्ता करण्यासाठी अर्धा किलोमीटर अंतरावरून चुकीच्या बाजूने आली. उजनी येथून भातागळी कडे जाणाऱ्या
या (MH 25 Z 4538) या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील भातागळी येथील ज्ञानेश्वर हनुमंत जगताप (वय 30 वर्ष) आणि हनुमंत माणिक जगताप (वय 70) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
ज्ञानेश्वर जगताप व हनुमंत जगताप पितापुत्र उजनी येथे उजनी येथे शेतातील औषध घेण्यासाठी आले होते. ते परत आपल्या गावाकडे जात असताना हा अपघात घडला त्यात बापलेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या व भादा पोलीस ठाण्यातील कर्मचारी व नातेवाईक यांनी शवविच्छेदन करण्यासाठी उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले .
उजनी मोड येथील बासुंदी महाराष्ट्र भर प्रसिद्ध आहे त्यामुळे येथे हॉटेलमध्ये बासुंदीचा व जेवण करण्यासाठी अनेक वाहणे थांबतात. कोणत्याही हॉटेलवर एस टी बस थांबल्यास मोफत जेवण मिळते. बासुंदी पार्सल व चालकास 200 रुपये भत्ता दिला जातो.
त्यामुळे प्रत्येक एस टी बस चालक या लालसेपोटी राँग साईड गाडी घालतात असाच प्रकार उजनी मोड येथे घडला. ज्ञानेश्वर जगताप यांचे 3 वर्षपूर्वी लग्न झाले होते. ते पुणे येथील कंपनी मध्ये काम करत होते. लॉकडाऊन झाल्यामुळे तो भातगळी गावात राहत होता व वडिलांना मदत म्हणून तो शेती करत असे त्याला 1 वर्षाची मुलगी आहे. त्यांच्या मृत्यू मुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.