
दै चालु वार्ता वृत्तसेवा
देगलूर : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेद्वार जितेश अंतापुरकर यांच्या प्रचारार्थ कुशावाडी येथे जाहीर सभा झाली. शेतकऱ्यांची चेष्टा करणे, शेतकऱ्यांच्या आंदोलनावर वाहने घालणे ही बाब पुन्हा पुन्हा होवु नये म्हणुन शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी अंतापुरकरांना विजयी करा असे मत तालुक्यातील कुशावाडी येथे प्रचारसभेदरम्यान शिवसेनेचे उपनेते तथा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांनी मत व्यक्त केले.सोयाबीनचे भाव अचानक कसे कमी होतात केंद्र सरकारने कुठेतरी भांडवलदारांची सुपारी घेतली आहे की काय अशी शंका येत आहे. इंधनाचे दरवाढ झाल्याने जनसामान्यांची आर्थिक घडी खुळखुळी झाली आहे. त्याचबरोबर पिकविमा कंपनीला केंद्राचा हप्ता आणखी दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही. असे मत या वेळी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले.
या वेळी दिवंगत आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या पत्नी शितल अंतापुरकर, काँग्रेस पक्षाचे बालाजी गाडे, तिरूपती कोंढेकर, माजी उपमहापौर विनय गिरडे, विठ्ठल पावडे, सतीश बस्वदे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष महेश पाटील, प्रहारचे तालुकाध्यक्ष कैलास येसगे व इतरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक शाम पाटील कुशावाडीकर यांनी तर संचलन बालाजी पाटील सांगवीकर तर आभार सरपंच प्रतिनिधी गुलाब पाटील यांनी व्यक्त केले.