
असा सणसणीत टोला आमदार आशिष शेलार यांनी आघाडी सरकारला लगावला
दै चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. त्यावेळी आघाडी कडून आरोप करण्यात आले होते की, या योजनेच्या कामात गुणवता नाही, सिंचन क्षमता वाढली नाही, पारदर्शकता नाही.मग चौकशी अंती आता तुमच्या जलसंधारण विभागाने काय उत्तर दिली ? असा सवाल ही शेलार यांनी उपस्थित केला. जलयुक्त शिवार मुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली, नगदी पिकांमध्ये शेतकऱ्यांची कमाई वाढली, लागवडीचा क्षेत्रफळ वाढले, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि फोटो जीओ मँपिंग केले गेले त्यात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवली गेली, आणि याच्यामध्ये गावकऱ्यांची सहभागिता होती असेही ते पुढे म्हणाले.
जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली.जलयुक्त शिवार चौकशी प्रकरणी जलसंधारण विभागाच्या टिप्पणीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.