
दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान अशा राजकारणातील २० वर्षांच्या मोदींच्या प्रवासानिमित्त दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमात संबोधित केले. यावेळी अमित शहा म्हणाले की, २०१४ च्या आधी जनतेच्या मनात शंका होती पण आज माझ्यापेक्षा जास्त लोकं मोदींना चांगलं ओळखतात. देशाच्या जनतेने पूर्ण बहुमतासह देशाची सत्ता मोदींच्या हाती २०१४ मध्ये सोपवली.
मला ट्रोल करण्यात आलं पण मी पुन्हा सांगतो, निरक्षरांची फौज घेऊन कोणता देश विकास करू शकत नाही. त्यांना शिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे. जी व्यक्ती संविधानाच्या अधिकार समजू शकत नाही ती देशाच्या विकासात सहभागी होऊ शकत नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला की मी निरक्षर लोकांच्या विरोधात आहे. पण तसं नाही. ते तर या व्यवस्थेचा बळी आहे. त्यांना शिकवण्याचं कर्तव्य सरकारचं आहे. जर सरकार हे काम करत नसेल तर त्या निरक्षर व्यक्तीचे गुन्हेगार आहे असंही अमित शहा म्हणाले.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा अनेक बदल कऱण्याचे त्यांनी प्रयत्न केले. काम करताना पारदर्शकतेवर त्यांनी भर दिल्याचंही अमित शहांनी यावेळी सांगितलं.
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली आहेत. आपण स्वतंत्र झाले तेव्हा देशाची संविधान सभा तयार झाली. या सभेने मल्टी पार्टी डेमोक्रेटिक सिस्टिम स्वीकारली. खूप विचार करून हे स्वीकारण्यात आलं होतं. इतका मोठा देश, इतकी विविधता, एखाद्या व्यक्तीच्या आधारे निवडणून यायला नको. मल्टी पार्टी डेमोक्रिटिक सिस्टिम असायला हवी. प्रत्येक पक्षाची एक विचारसरणी असायला हवी असंही अमित शहा म्हणाले.