
दै चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदी भारतीय वंशाची असलेल्या अनिता आनंद यांची वर्णी लागली आहे.पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये अनिता आनंद यांच्यावर देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अनिता आनंद यांच्या आधीही भारतीय वंशाचे हरजीत सज्जन हे संरक्षण मंत्री होते. लष्करातील प्रमुख सुधारणांवर अनिता आनंद यांचा भर असेल असं म्हटलं जात आहे.
अनिता आनंद यांच्याकडे संरक्षण खाते सोपवल्यानंतर हरजीत सज्जन यांच्याकडे परराष्ट्र खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हरजीत यांच्यावर लष्करातील व्यभिचाराची प्रकरणे हाताळण्यात अपयश आल्याचे आरोपही झाले आहेत. अनिता यांच्याकडून आता लष्करातील या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचं आव्हान असणार आहे.