
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई येथील यज्ञ सेवा समितीच्या वतीने ३१ ऑक्टोबर रविवार रोजी श्री योगेश्वरी मंदिरात सायंकाळी ५ वाजता सामुदायिक श्रीसूक्त हवन या धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास गंगाखेड येथील अहीताग्नि बहुसोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर रंगनाथ सेलूकर महाराज यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभणार आहे. सद्गुरू यज्ञेश्वर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीसूक्त हवन हा उपक्रम होणार आहे. तसेच या प्रसंगी ह. भ. प. गंगाधर कुलकर्णी (बाळू महाराज नाव्हेकर) हे त्यांच्या रसाळ वाणीमध्ये श्रीसुक्तावर हितगुज साधणार आहेत. कृपया अंबाजोगाई शहरातील भाविकांनी उपस्थित राहून श्रीसूक्त हवनाच्या या शुभ कार्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा व सद्गुरुदर्शनाचा लाभ घ्यावा. हवनाचे सर्व साहित्य कार्यक्रमस्थळी संयोजन समितीच्या वतीने उपलब्ध करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजिका निर्मला अविनाशराव कुलकर्णी, अविनाश मुडेगांवकर, बाबुराव बाभुळगांवकर, प्रशांत बर्दापुरकर, रंजना बाभुळगांवकर, दिनकर पसारकर, विजय जड, मुरलीधर गोवर्धन, सुभाष वट्टमवार, आनंद टाकळकर, श्रीकांत जोशी, प्रा. सुंदर खडके, प्रा. योगेश • कुलकर्णी व यज्ञ सेवा समिती, अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात आले आहे.